ST महामंडळाच्या बस मधून प्रवास करत मुंबईत येऊन पोहोचलो आणि दादर बस स्थानकातून रेल्वे स्थानकाकडे जायला निघालो. आज कामाचा पहिला दिवस, त्यामुळे वेळेच्या आधीच पोहोचायचे होते. रेल्वेतून जाताना मुंबईची गर्दी जास्त भयंकर की इथली उष्णता अशा विचारात मी CSTM ला उतरुन मंत्रालयाच्या मार्गावर चालू लागलो. याआधी मुंबईत कधी आलो नव्हतो पण कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या वेळी इथे येणे व्हायचे, त्यामुळे इथली ओळख थोडी झाली होती. नोकरदार वर्गाची कार्यालयात पोहोचण्याची घाई बघता बघता मीही त्या गर्दीचा हिस्सा होऊन गेलो. कोणी उशीर होऊन लेट मस्टर लागेल या काळजीने लगबगीने गर्दी सारत पुढे जाताना दिसत होते, कोणी काल जास्त वेळ काम केले म्हणून आज वेळेत सूट मिळवून निवांत सगळीकडे नजरा टाकत चालत होते. मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीसमोर येताच थोडा वेळ थांबून पाहत राहिलो ते भव्य दिव्य दृश्य. इथपर्यंत पोहोचण्याची पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण होण्याचा तो आजचा दिवस. खुप आनंद उत्साह होता आणि आज काय काय घडामोडी घडतील याची उत्सुकता लागली होती. आतमध्ये ग...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स